IND W vs PAK W : भारतासमोर पाकिस्तानचे १०० धावांचे आव्हान | पुढारी

IND W vs PAK W : भारतासमोर पाकिस्तानचे १०० धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क ; राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना आज ग्रुप अ मधील पाकिस्तानसोबत होत आहे.  दाेन्‍ही संघांसाठी हा सामना महत्त्‍वपूर्ण आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजचा सामना जिंकल्यास भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तनी संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या मेघना सिंगने  पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज इरम जावेद हिला  0 धावांवर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी मेघना सिंगने यास्तिका भाटिया करवी इरमला झेलबाद केले.

यानंतर भारताची गोलंदाज स्नेह राणाने पाकिस्तानच्या मुनीबा अली आणि बिस्माह मारूफ यांना एकाच षटकात बाद करत दोन धक्के दिले. यावेळी मुनीबा अलीला ३२ धावांवर स्नेहने झेलबाद केले तर बिस्माह मारूफला १७ धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. तर सामन्याच्या १२ व्या षटकांत भारताची गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानची फलंदाज आयशा नसीमला १० धावांवर बाद केले. भारताची गोलंदाज शैफाली वर्माने पाकिस्तानची फलंदाज फातिमा सणाला ८ धावांवर बाद करत पाकिस्तानला सातवा धक्का दिला. यानंतर उरलेल्या फलंदाजांना राधा यादवने बाद केले व पाकिस्तानला शंभर धावसंख्या ओलांडण्याच्या आधीच ऑल आऊट केले

.

Back to top button