सांगलीच्‍या संकेत सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले, दुखापतीमुळे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले

सांगलीच्‍या संकेत सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले, दुखापतीमुळे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सांगलीच्‍या संकेत महादेव सरगर याने राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत ५५ किलो वजनी गटात रौप्‍य पदक पटकावले. त्‍याने एकुण २४८ किलो वजन उचलून भारतासाठी स्‍पर्धेतील पहिले पदक पटकावले.क्‍लीन अँड जर्कमध्‍ये संकेत याने १३५ चजन उचलून दमदार सुरुवात केली. तो दुखापग्रस्‍त असतानाही त्‍याने उत्‍कृष्‍ट प्रदर्शन केले. अखेर मलेशियाचा वेटलिफ्टिर मोहम्‍मद अनिक याने संकेतपेक्षघ केवळ एक किलो वजन जास्‍त उचलून सुवर्णपदक आपल्‍या नावावर केले.

तिसर्‍या प्रयत्‍नात सुवर्णपदकाच्‍या शर्यतीमध्‍ये आघाडीवर असणार्‍या संकेतने १४२ किलो वजन उचलण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍याच्‍या हाताचा कोपरा दुखावल्‍याने त्‍याचा प्रयत्‍न अयशस्‍वी झाला. मलेशियाचा वेटलिफ्टिर मोहम्‍मद अनिक याने संकेतपेक्षघ केवळ एक किलो वजन जास्‍त उचलून सुवर्णपदक आपल्‍या नावावर केले आणि संकेतला रौप्‍य पदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news