पुढारी ऑनलाईन डेस्क : २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला (Commonwealth Games 2022) काल (दि. २८) रंगतदार सुरुवात झाली. बर्मिंगहॅमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीय संघांचे नेतृत्व बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग यांनी केले.
२८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती पीव्ही सिंधू तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या मनप्रीतनेच्या नेतृत्वाखाली हॉकी संघ यासोबत राष्ट्रकुल स्पर्धेच्या भारतीय संघाकडून या वर्षी अधिक सुवर्ण कामगिरी होण्याच्या अपेक्षा आहेत. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून माघार घेतल्याने सुरुवातीलाच भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. सुमारे ७२ देशांतील ५००० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने २००च्या आसपास खेळाडू असलेल्या भारतीय संघाला कांटे-की-टक्कर करावी लागणार आहे.
हे वाचलंत का?