ODI World Cup 2023 : करवाढीमुळे विश्वचषकाचे आयोजन धोक्यात

ODI World Cup 2023 : करवाढीमुळे विश्वचषकाचे आयोजन धोक्यात
Published on
Updated on

मुंबई : वृत्तसंस्था : सामान्य जनताच नव्हे, तर महागाईची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयच्या दारापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे 2023 मध्ये भारतात होणार्‍या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेचे (ODI World Cup 2023) यजमानपद संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थमंत्रालयाने क्रीडा स्पर्धांवरील कर वाढवून तो 21 टक्के इतका केला आहे आणि त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेसाठी बीसीसीआयला 21 टक्के कर भरावा लागणार आहे. हा कर 10 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांवर गेल्याने बीसीसीआयला आता आयसीसीकडून मिळणार्‍या एकूण महसुलातील 800 कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे.

2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर 10 टक्के कर आकारला गेला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात वर्ल्डकप होणार आहे. एका क्रीडावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अर्थमंत्रालयाने पुढील वर्षी होणार्‍या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या करात वाढ केल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) मधून एकूण 4000 कोटी महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार जवळपास 800 कोटींचा कर बीसीसीआयकडून सरकारला द्यावा लागणार आहे. सध्याच्या नियमानुसार आयसीसीला यजमान देशाकडून कर सवलत मिळणे अपेक्षित आहे. यजमान क्रिकेट बोर्डाने त्यासाठी सरकारची चर्चा करणे गरजेचे आहे.

भारतात ही परिस्थिती प्रथमच उद्भवत नाही. यापूर्वी 2016 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानही कर सवलतीवरून आयसीसीने स्पर्धा रद्द करण्याची धमकी बीसीसीआयला दिली होती. पण, अखेरच्या क्षणाला हा मुद्दा सुटला अन् भारताने यजमानपद भूषविले. आताही हा वाद सुटला नाही, तर बीसीसीआयला 800 कोटींचा फटका बसणार आहे. आयसीसीकडून दिल्या जाणार्‍या महसुलातून ही रक्कम कमी करण्यात येईल. ते मान्य नसल्यास बीसीसीआयला स्पर्धा आयोजनावरून हक्क गमवावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news