IND vs ENG 3rd ODI : रिषभ पंतच्या दमदार खेळीमुळे मालिका भारताच्या खिशात | पुढारी

IND vs ENG 3rd ODI : रिषभ पंतच्या दमदार खेळीमुळे मालिका भारताच्या खिशात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेवर भारताने कब्जा केला. भारताने हा सामना जिंकून २-१ अशी मालिका खिशात घातली. ऋषभ पंतचे शानदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.

भारताला चौथा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. क्रेग ओव्हरटनने त्याला १६ धावांवर बाद केले.

भारताकडून खराब सुरूवात; 3 फलंदाज स्वस्तात माघारी

भारताकडून इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी मैदानात उतरली. संथ गतीने खेळाची सुरूवात केली. परुंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या आक्रमक गोलंदाजी पुढे भारताच्या सलामी जोडीला फार काळ टिकता आले. नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीने भारताला तीन धक्के दिले. यामध्ये पहिला त्याने शिखर धवनला बाद केले. शिखर धवन केवळ 1 धाव करून बाद झाला. त्याचबरोबर त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना  प्रत्येकी 17 धावांवर बाद केले

टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले. आक्रमक खेळीकरून धावा करण्याच्या इराद्याने फलंदाजी करत असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या विकेट्स गमावाव्या लागल्या. जॉनी बेअरस्टो (0), जो रूट (0) हे खेळाडू धावाचे न उघडता तंबूत परतले. इंग्लंडकडून जेसन रॉय (41), बेन स्टोक्स (27), मोईन अली (34), लियाम लिव्हिंगस्टोन (27) आणि कर्णधार जोस बटलर (60) या फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हार्दिक पांड्याने 4, युझवेंद्र चहल ३ आणि मोहम्मद सिराजने ३ बळी घेतले. आजच्या सामन्यात 4 विकेट घेऊन हार्दिक त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ एक बदल करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात 6 विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या सामन्यात विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी इंग्लंडने दुसरा सामना 100 धावांनी जिंकला होता. त्यामुळे तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, परंतु इंग्लंडच्या मायभूमीवर तीन मालिका जिंकल्या आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्‍मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.

Back to top button