Sourav Ganguly : सौरव गांगुलीची लंडनच्या रस्त्यावर ‘दादागिरी’; डान्सचा व्हिडिओ व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतेच ५० व्या वर्षात पर्दापण केले. गांगुली यांनी आपला ५० वा वाढदिवस लंडनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारताचा माजी आघाडीचा फलंदाज सचिन तेंडूलकर यांनीही हजेरी लावली होती. सचिनसोबत गांगुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता गांगुलीचा (Sourav Ganguly) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत गांगुली डान्स करताना दिसत आहे.
गांगुलीसोबत (Sourav Ganguly) त्याची मुलगी सनाही डान्स करतान दिसत आहे. या व्हिडिओवर गांगुली यांच्या समर्थकांकडून कमेंटचा वर्षाव होऊ लागला आहे. दरम्यान, सौरव गांगुली भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. गांगुलीच्या नेतृत्वाखाली युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, हरभजनसिंग यांची कारकीर्द बहारली. गांगुली यांनी भारताला अनेक कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकून दिल्या आहेत. त्याची खेळाप्रती असलेली बांधिलकी वादातीत होती.
हेही वाचलंत का ?
- Shahrukh Khan Mother : शाहरुखच्या आईचा फोटो व्हायरल, इंदिरा गांधींशी होते त्यांचे खास नाते?
- श्रीलंकेतील संघर्ष टोकाला! आंदोलकांनी घेरल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचे निवासस्थानातून पलायन
- Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेल्वन'चा भव्य-दिव्य टीझर रिलीज, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यपुढे 'तिची' स्पर्धा (Video)

