‘कॅप्टन कूल’ विम्बल्डनमध्ये | पुढारी

‘कॅप्टन कूल’ विम्बल्डनमध्ये

लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या माजी कर्णधारावर करोडो फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, धोनीने आपला 41 वा वाढदिवस भारतात नव्हे, तर इंग्लंडमध्ये साजरा केला. विशेष म्हणजे भारतीय संघदेखील सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. मात्र, धोनी टीम इंडियासाठी इंग्लंडमध्ये गेलेला नसून तो इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डनमध्ये राफेल नदालचा सामना पाहण्यासाठी गेला होता. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या आवडत्या राफाचा सामना पाहण्यासाठी धोनीने विम्बल्डनच्या सेंट्रल कोर्टवर उपस्थिती दर्शवली. याबाबतची माहिती विम्बल्डनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. धोनी स्टँडमध्ये बसून राफेल नदालचा रोमांचक सामना पाहत असतानाचा फोटो विम्बल्डनने शेअर केला. त्याला ‘भारताचा दिग्गज सामना पाहत आहे’ अशी कॅप्शन दिली आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जनेदेखील हाच फोटो शेअर केला.

हेही वाचा

Back to top button