Cheteshwar Pujara And Rishabh Pant : चेतेश्वर पुजारा-ऋषभ पंतची जोडी ठरतेय भारतासाठी संकटमोचक | पुढारी

Cheteshwar Pujara And Rishabh Pant : चेतेश्वर पुजारा-ऋषभ पंतची जोडी ठरतेय भारतासाठी संकटमोचक

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटमध्ये विशेषत: कसोटीमध्ये फलंदाजांच्या भागीदारीला खूप महत्त्व असते. अनेक खेळाडू खेळत असतात आपले योगदान देत असतात पण, अनेकवेळा त्यांची कामगिरी नजरेत येत नाही. आपल्याकडे वैयक्तीक कामगिरीकडे अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे दोन फलंदाजांनी रचलेल्या भागीदाऱ्यांकडे दर्लक्ष केले जाते. पण, सध्याचे युग हे डिजीटल आकड्यांचे आहे. जेव्हा विशेष गोष्टी घडतात तेव्हा आकडे समोर येतातच. अलिकडच्या काळात भारतीय संघ संकटात सापडल्यावर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत (Cheteshwar Pujara And Rishabh Pant) यांनी एकत्र येत आपल्या भागीदारीच्या जोरावर संघाला सावरण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. इंग्लंड सोबत सुरु असेलेल्या पाचव्या कसोटी (England vs India, 5th Test) सामन्यात पुन्हा एकदा संघ अडचणीत सापडल्यावर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत हे धावून आल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले.

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसामन्यात तिसऱ्या दिवशी भारताची अवस्था ३ बाद ७५ अशी झाली होती. सलामीवीर शुभमन गील, हनुमा विहारी आणि विराट कोहली तंबुत परतले होते. भारत पुन्हा एकदा संकटात सापडला होता. तेव्हा चेतश्वर पुजाराची साथ देण्यासाठी पहिल्या डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत मैदाना उतरला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपे पर्यंत दोघांनी ही कोणतीही पडझड न होऊ देता भारताला ३ बाद १२५ पर्यंत पोहचवले. त्यांनतर चौथ्या दिवशीचा खेळी सुरु करुन या जोडीने भारतातला १५३ धावांपर्यंत पोहचलवले. यावेळी चेतेश्वर पुजारा आपले अर्धशतक पुर्ण करुन ६६ धावांकरुन खेळत होता. तेव्हा स्टुअर्ट ब्रॉड याने चेतेश्वर पुजारला ॲलेक्स लीजकडे झेल देण्यास भाग पाडून बाद केले. तो पर्यंत या जोडीने भारताचा डाव मजबूत करत दोघांनी मिळून महत्त्वपूर्ण ७८ धावांची भागीदारी रचली. (Cheteshwar Pujara And Rishabh Pant)

चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी रचलेली भागिदारी (२०१९ पासून २०२२ पर्यंत) (Cheteshwar Pujara And Rishabh Pant)

भागिदारी        कोठून सुरु          विरोधी संघ      ठिकाण          वर्ष

  • ७८              ३ बाद ७५               इंग्लंड          बर्मिंघम        २०२२
  • ११९              ४ बाद ७३              इंग्लंड            चेन्नई           २०२१
  • ६१                ३ बाद १६७          ऑस्ट्रेलिया       ब्रिस्बेन         २०२१
  • १४८             ३ बाद १०२           ऑस्ट्रेलिया        सिडनी         २०२१
  • ५३               ४ बाद १४३           ऑस्ट्रेलिया        सिडनी        २०२१
  • ८९              ५ बाद ३२९           ऑस्ट्रेलिया        सिडनी         २०१९

या सामन्याप्रमाणे भारतीय संघ अडचणीत असताना या दोघांच्या भागिदारीने अनेक वेळा संघाला सावरण्याचे काम केले आहे. ही गोष्ट २०१९ पासून पाहण्यास मिळत आहे. २०१९ पासून जेव्हा जेव्हा भारत अडचणी सापडला तेव्हा दोघांनी मिळून छोट्या – मोठ्या अशा मिळून सहा पण महत्त्वपूर्ण भागिदाऱ्या रचल्या आहेत. यामुळे भारतीय संघाला पुढच्या संघावर दबाव टाकणे अधिक सोपे झाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फलंदाजी शैली भिन्न अशी उलट एकमेकांच्या शैलीच्या विरोधी अशी दोघांची शैली आहे. चेतश्वर पुजार अत्यंत शांत स्वभावाने फलंदाजी करतो. तो कोठेही घाई गडबड करताना दिसत नाही. तो नेहमी खुट्टा गाडून खेळपट्टीवर उभा राहतो. त्याच्या उलट ऋषभ पंत हा कसोटीमध्ये सुद्धा आक्रमक फलंदाजी करतो. गोलंदाजीची लय बिघडवण्यात त्याचा जास्त विश्वास आहे. यामुळे तो अगदी टी २० प्रमाणे कमी चेंडूत अधिक धावा घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो.

 

Back to top button