‘केएसए’ टेबल टेनिस जुनेद, आर्या, हर्षदा, यांची विजयी सलामी | पुढारी

‘केएसए’ टेबल टेनिस जुनेद, आर्या, हर्षदा, यांची विजयी सलामी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  हौशी टेबल टेनिस स्पर्धेच्या 11 व 13 वर्षांखालील गटात अनुक्रमे जुनेद मगदूम व आर्या आराध्ये तर महिला वेट्रन्स गटात हर्षदा लाड व मनीष पिंगे यांनी विजयी सलामी दिली.

कोल्हापूर हौशी टेबल टेनिसपटू व कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) यांच्या सहकार्याने ‘कोल्हापूर सेकेंड डिस्ट्रिक्ट’ मानांकित टेबल टेनिस स्पर्धेस नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून 160 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात 130 मुले, 30 मुलींचा सहभाग आहे. 11, 13, 15, 17, 19 व खुला अशा विविध वयोगटांत स्पर्धा सुरू आहे. यासाठी ‘केएसए’ व कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन के.एस.ए.चे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी सहसचिव राजेंद्र दळवी, टेबल टेनिस सचिव नितीन जाधव, को.जि.टे.टे.असो.चे संचालक सुरेश देशपांडे, प्रताप घोरपडे, प्रशिक्षक संग्राम चव्हाण व मुख्य पंच सचिन कोगनोळे यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थितीत होते.

Back to top button