Jasprit Bumrah : ‘कॅप्टन’ बुमराहच्या खेळीने युवराज सिंगच्या ‘त्या’ खेळीची झाली आठवण | पुढारी

Jasprit Bumrah : ‘कॅप्टन’ बुमराहच्या खेळीने युवराज सिंगच्या ‘त्या’ खेळीची झाली आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटला नेहमी अनिश्चीतेचा खेळ समजला जातो. क्रिकेटमध्ये कधी केव्हा काय होईल, हे कोणालाच माहित नसते. अनेक दिग्गज खेळाडू जसे विवियन रिचर्ड, सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, सेहवाग, ख्रिस गेल, विराट कोहली या सारखे स्फोटक फलंदाज जे करु शकले नाहीत. असा कारनामा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बॅटने करुन दाखवला आहे.

इंग्लड विरुद्‍धच्‍या पाचव्या आणि निर्णायक कसोटीत (IND vs ENG 5th Test) कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा
दहाव्या क्रमाकांवर फलंदाजीस येऊन एक वादळी खेळी केली. या खेळीने युवराज सिंग याच्या त्या एका षटकातील ६ षटकारांची पुन्हा एकदा क्रीडारसिकांना आठवण झाली. तसेच बुमराहच्या या वादळी खेळीने १४५ वर्षांचा कसोटी इतिहातील नवा रेकॉर्ड बनवत इतिहास रचला.

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर खेळपट्टीवर असणाऱ्या रवींद्र जडेजाने आपले कसोटी कारकिर्दीतील ३ रे शतक झळकावले. जडेजा हा संघाच्या ३७५ धावा झाल्या असताना १०४ धावा करुन जेम्स अँडसनची शिकार ठरला. जडेजा गेल्यावर भारत ४०० धावांचा टप्पा देखील गाठू शकणार नाही असे वाटत होते. पण, कर्णधार जसप्रित बुमराहच्या (Jasprit Bumrah) एका खेळीने सारेच चित्रच पालटले.

इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ८४ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने (Jasprit Bumrah) चौकार ठोकला. दुसरा चेंडू ब्रॉडने वाईड टाकला आणि तो चेंडू यष्टीरक्षक पकडू न शकल्याने चौकार गेला. त्यामुळे बायच्या ५ अधिक धावा मिळाल्या. पुढील चेंडू ब्रॉडने नो बॉल टाकला आणि बुमराहने जोरदार षटकार लगावला. पुढील फ्री हिटच्या चेंडूवर बुमराहने चौकार ठोकला. त्यानंतर सलग दोन चेंडूवर पुन्हा बुमराहने दोन चौकार ठोकले. पुढील चेंडूवर पुन्हा एकदा बुमराहने गगनचुंबी षटकार लगावला आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव घेतली. बुमराहच्या या वादळी खेळीने सारे इंग्लंडचे खेळाडू आणि प्रेक्षक अवाक झाले होते. अशा प्रकारे ब्रॉडची धुलाई करत बुमराहने त्याच्या षटकात तब्बल ३५ धावा कुटल्या. त्याच्या या वादळी खेळीने तमाम प्रेक्षकांना स्टुअर्ट ब्रॉडलाच युवराज सिंगने पहिल्या टी २० वल्डकपमध्ये एका षटकात ठोकलेल्या सहा षटकारांची आठवण झाली.

कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडे षटक 

१४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेले सर्वात महागडे षटक ठरले. त्याच्या एका षटकात बुमराहने ३५ धावा कुटल्या. या आधी २००३-०४ मध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रायन लारा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका षटकात ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा केल्या होत्या. यासह क्रिकेट इतिहासात आतापर्यंत तीन फलंदाजांनी एका षटकात २८ धावा घेतल्या होत्या आणि ते सर्वात महागडे षटक ठरले होते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराने याने ब्रॉडला एका षटकात ३५ धावा घेत आतापर्यंत सर्वात महागडे षटक ठरवले.

युवराज सिंगचे सहा षटकार

पहिला टी २० विश्वचषक हा 2007 साली दक्षिण आफ्रिका येथे खेळविण्यात आला. नवा कर्णधार एमएस धोनी यांच्या नेत्तृत्वाखाली भारतीय संघ पाठविण्यात आला होता. या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात भारताची इंग्लंड सोबत गाठ पडली होती. दरम्यान युवराज सिंग फलंदाजी करत असताना त्याचा मैदानावर इंग्लंडचा खेळाडू ॲड्रयु फ्लिंटॉप, स्टुअर्ट ब्रॉड यांच्याशी काहीतरी वाद झाला. चिडलेल्या युवराजसिंगने त्यानंतर गोलंदाजी करण्यास आलेले स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकातील सहाही चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकले. युवराज सिंगची ती ऐतिहासिक खेळी होती. या युवराजच्या या खेळीला आज ही आठवले जाते. अनेक क्रीडारसिक यु ट्युबवर आजही त्याच्या त्या खेळीचा व्हिडिओ पाहतात. बुमराह याच्या खेळीने पुन्हा एकदा क्रीडारसिकांना युवराजच्या खेळीचे स्मरण झाले.

Back to top button