Virat Kohli | विराट बनला आशियातील सर्वाधिक कमाई करणारा स्पोर्ट्स सेलिब्रिटी, एका इन्स्टा पोस्टसाठी घेतो ‘इतके’ कोटी

Virat Kohli | विराट बनला आशियातील सर्वाधिक कमाई करणारा स्पोर्ट्स सेलिब्रिटी, एका इन्स्टा पोस्टसाठी घेतो ‘इतके’ कोटी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याला एकही शतक करता आलेले नाही. पण क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता कायम आहे. स्पोर्ट्स सेलिब्रिटी (sports celebrity) म्हणून तो आजही चर्चेत आहे. एका रिपोर्टनुसार, विराट कोहली फोटो शेअरिंग सोशल ॲप इन्स्टाग्रामवर (Instagram) आशियातील सर्वाधिक कमाई करणारा स्पोर्ट्स सेलिब्रिटी बनला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, कोहलीला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ८ कोटी रुपये मिळतात. गेल्या वर्षी कोहली एका इन्स्टाग्राम (Virat Kohli) पोस्टसाठी ५ कोटी घेत होता. तो १८ व्या स्थानी होता. पण २०२२ मध्ये त्याने कमाईत १४ व्या स्थानी झेप घेतली आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २० कोटी फॉलोअर्स आहेत. लोकप्रिय व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवर इतके फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

hopperhq.com ने इन्स्टाग्राम रिच लिस्ट जारी केली आहे. यानुसार कोहली एका स्पॉन्सर पोस्टसाठी १,०८८,००० डॉलर (सुमारे ८.६९ कोटी) कमाई करतो. यामुळे तो आशियातील सर्वाधिक कमाई करणारा स्पोर्ट्स सेलिब्रिटी बनला आहे. जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत कोहली १४ व्या स्थानावर असून टॉप १५ मध्ये तो एकमेव भारतीय आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा २७ व्या स्थानावर असून तिची एका पोस्टसाठी कमाई ३ कोटी रुपये आहे. जगभरातील खेळाडूंचा विचार केल्यास पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो टॉपवर आहे. तो एका पोस्टमधून सुमारे १९ कोटी रुपये कमाई करतो. तर लिओनेल मेस्सी इन्स्टाग्रामवर पेड पोस्टमधून १४ कोटी रुपये कमावतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news