इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनची निवृत्ती | पुढारी

इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनची निवृत्ती

लंडन : इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2006 मध्ये त्याने इंग्लंडच्या संघाकडून पदार्पण केले होते. त्याआधी त्याने आयर्लंड संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. 35 वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा वन-डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने 225 वन-डे सामन्यांत 13 शतकांसह 6,957 धावा केल्या आहेत. एकूण वन-डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 7,701 धावा आहेत आणि 14 शतके आहेत.

मॉर्गनच्या या निर्णयामुळे भारताविरुद्धच्या आगामी टी-20 व वन-डे मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व दुसर्‍याकडे सोपवले जाईल. मॉर्गनने 126 सामन्यांत इंग्लंडने नेतृत्व केले आणि त्यापैकी 76 मध्ये विजय मिळला. 2019 च्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद हा त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.

टी-20 क्रिकेटमध्येही त्याने 115 सामन्यांत 136.18 च्या स्ट्राईक रेटने 2,458 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 72 सामन्यांत नेतृत्व करताना 42 विजय मिळवले आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात तीन टी-20 व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दुसरा कर्णधार मिळणार आहे. जोस बटलरकडे ही जबाबादरी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button