अडीच महिने आयपीएल खेळवण्याला पाकचा विरोध

अडीच महिने आयपीएल खेळवण्याला पाकचा विरोध
Published on
Updated on

लाहोर ; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयपीएलला आयसीसी वेळापत्रकात अडीच महिन्यांची विंडो देण्याचा प्रस्ताव आला तर त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी संचालक रमीझ राजा यांनी याबाबत आयसीसीच्या पुढच्या बैठकीवेळी आवाज उठवला जाईल, असे सांगितले.

रमीझ राजा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, आतापर्यंत आयपीएलची विंडो वाढवून देण्याबाबत कोणतीही घोषणा किंवा निर्णय झालेला नाही. याबाबत मी आयसीसी बैठकीवेळी माझे मत व्यक्‍त करणार आहे. माझे मत अगदी स्पष्ट आहे. जागतिक क्रिकेटमध्ये जर असा निर्णय झाला, तर याचा अर्थ आपल्याला कमी पैसे मिळणार. याला आम्ही नक्‍कीच सर्व शक्‍तीनिशी आव्हान देणार, आयसीसीमध्ये आमचे म्हणणे सक्षमपणे मांडणार.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले होते की, भारतीय बोर्डाला आयसीसीच्या पुढच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये आयपीएलची विंडो वाढवून मिळेल. आयसीसीचा पुढचा फ्युचर टूर प्रोग्राम हा 2024 ते 2031 पर्यंतचा असणार आहे.
शहा म्हणाले होते की, पुढच्या एफटीपी सायकलमध्ये आयपीएलला अधिकृतरीत्या अडीच महिन्यांची विंडो मिळेल. यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्यात अडचण येणार नाही; पण पाकिस्तानला आयपीएलमध्ये प्रवेश नसल्याने आमच्या खेळाडूंना या अडीच महिन्यांत हातावर हात ठेवून बसावे लागेल. त्यामुळे आम्ही याबाबत विविध क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्याशी चर्चा करणार आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news