पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या एकदिवसीय मालिकेसाठी नेदरलँडच्या दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना आम्सटलवेनच्या वीआरए मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकात नेदरलँड समोर तब्बल ४९८ धावांचा विश्वविक्रमी डोंगर उभा केला आहे. या खेळीत इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ही सर्वांत मोठी धावसंख्या आहे. यापुर्वी इंग्लंडनेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४८१ धावा उभारल्या होत्या. (NED vs ENG)
विश्वकप विजेत्या इंग्लंडच्या संघाशिवाय कोणत्याही संघाला एकदिवसीय सामन्यात ४५० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. २०१८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रलियाच्या विरोधात नॉटिंघममध्ये ४८१ धावा काढल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात तिसरी सर्वांत मोठी धावसंख्या इंग्लंडच्याच नावावर आहे. २०१६ मध्ये इंग्लंडने पाकिस्तान विरोधात इंग्लंडच्या संघाने ४४४ ठोकल्या होत्या. (NED vs ENG)