IND vs SA : टीम इंडियाला बरोबरीची संधी

IND vs SA : टीम इंडियाला बरोबरीची संधी
Published on
Updated on

राजकोट ; वृत्तसंस्था : विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान जिवंत राखले असले तरी मालिका पराभवाचा धोका अजून टळलेला नाही. आज शुक्रवारी होणार्‍या चौथ्या सामन्यात ऋषभच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. असे झाले नाही तर मालिका पराभवासोबत नामुष्कीही पदरात पडणार आहे. कारण, भारताविरुद्ध पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ टी-20 मालिका जिंकण्यापासून फक्त एक सामना दूर आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या 2-1 ने आघाडीवर आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांत टेम्बा बवुमाच्या संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला, तर टीम इंडियाने तिसर्‍या सामन्यात दणदणीत पुनरागमन करत आपले खाते उघडले. आता चौथ्या सामन्यापूर्वी मार्कराम उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला आहे, तर त्यांचा स्टार सलामीवीर क्विंटन डिकॉक संघात सहभागी होणार आहे.

चौथा सामना 17 जून रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत एडन मार्करामला एकही सामना न खेळता बाहेर पडणे भाग पडले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सीएसएने ट्विटमध्ये म्हटले आहे की, एडन मार्करामला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कोव्हिड-19 ची लागण झाल्याचे आढळल्यानंतर फलंदाजाने सात दिवस क्वारंटाईनमध्ये घालवले. तो शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी पुनरागमन करू शकणार नाही.

अशा परिस्थितीत आता टीम इंडियासाठी मालिका विजयाची संधी चालून आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मार्कररम एक खतरनाक फलंदाज आणि भारतीय खेळपट्टींवर खेळण्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे. याशिवाय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने निवेदनात पुढे लिहिले आहे की मार्कराम स्वस्थ असून त्याला घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मार्कराम मालिकेतून बाहेर पडला असला तरी दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बातमी अशी आहे की यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या मनगटाच्या दुखापतीतून सावरला असून चौथ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाने पहिल्या तीन सामन्यांत फारसे प्रयोग केलेले नाहीत. त्यामुळे चौथ्या सामन्यात तरी उमरान मलिकला संधी मिळेल की नाही याविषयी शंका आहे.

संघ यातून निवडणार

भारत : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), रीजा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच नोर्किया, वेन पोर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वान डर डुसेन आणि मार्को यानसेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news