दहा महिन्यांनंतर नीरज चोप्रा परतणार मैदानावर

Lausanne Diamond League
Lausanne Diamond League
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. फिनलँडमध्ये होणार्‍या पावो नूरमी गेम्स 2022 या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल. पावो नूरमी गेम्स ही स्पर्धा ही जागतिक अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे. डायमंड लीगनंतर पोवो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.

नीरज चोप्राव्यतिरिक्त ग्रेनेडाचा विद्यमान जगज्जेता अँडरसन पीटर्स, टोक्यो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज आणि लंडन 2021 ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉल्कोट हे पुरुषांच्या 10-अ‍ॅथलिट भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चोप्राचा कट्टर प्रतिस्पर्धी व जर्मन खेळाडू जोहान्स वेटरदेखील तुर्कू येथील स्पर्धेत सहभागी होणार होता. परंतु, त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचे देशबांधव ज्युलियन वेबर आणि अँड्रियास हॉफमन मात्र या ठिकाणी येणार आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास 10 महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरणार आहे. मैदानात आल्यानंतर त्याला जगातील दिग्गज भालाफेकपटूंचा सामना करावा लागणार आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेमध्ये पीटर्स आणि वडलेच या दोघांनीही 90 मीटरचा टप्पा पार केलेला आहे. पीटर्सने दोहा येथे 93.07 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. या हंगामातील हा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.

नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे. पुढील महिन्यात होणार्‍या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल. तुर्कूनंतर नीरज चोप्रा फिनलँडमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news