ENG vs NZ : इंग्लंडचा पाच विकेटस्नी विजय

ENG vs NZ : इंग्लंडचा पाच विकेटस्नी विजय

लंडन ; वृत्तसंस्था : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 5 गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्याचा निकाल चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात लागला. कारण तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी फक्त 61 धावांची गरज होती.

लॉर्डस् क्रिकेट मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जो रूटच्या नाबाद 115 धावांच्या जोरावर इंग्लंडने लॉर्डस् कसोटी जिंकली. रूटशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनेही अर्धशतक झळकावले होते. यष्टिरक्षक फलंदाज बेन फॉक्स 32 धावांवर नाबाद राहिला आणि यजमानांनी हा सामना पाच गडी राखून जिंकला. जो रूट 115 आणि बेन फॉक्सने 32 धावा करून नाबाद परतला. रूटने 26 वे शतक झळकवले आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडला चौथ्या दिवशी एकही विकेट मिळाली नाही. (ENG vs NZ)

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संघ 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. तर दुसर्‍या डावात डॅरियल मिशेलच्या शतकी खेळीमुळे किवींनी 285 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 277 धावांचे लक्ष्य ठेवले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news