मोटारस्पोर्टस् रेसर यश आराध्य याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान | पुढारी

मोटारस्पोर्टस् रेसर यश आराध्य याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : बंगळुरूचा यश आराध्य प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवणारा मोटारस्पोर्टस्मधील पहिला व्यक्‍ती ठरला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित सोहळ्यात यश याने पुरस्कार स्वीकारला. 17 वर्षीय यश वयाच्या नवव्या वर्षांपासून रेसिंग ट्रॅकवर असून, त्याने 13 चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळविले आहेत. यासोबत 65 पोडियम फिनिश आणि 12 पुरस्कार मिळवले आहेत.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 18 वर्षांखालील विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यश याच्यासह इतर 49 हुशार मुलांची निवड महिला आणि बालविकास, केंद्रीय मंत्रालयाने स्थापन केलेल्या एलिट पॅनेलद्वारे केली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यापूर्वी प्रधानमंत्री त्यांना भेटतील.

Back to top button