IPL 2022 : पहिल्याच भारतीय खेळाडूला मिळाली ती ‘चकाकती कार’ | पुढारी

IPL 2022 : पहिल्याच भारतीय खेळाडूला मिळाली ती ‘चकाकती कार’

पुढारी ऑनलाईन : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्‍या गुजरात टायटन्सने आयपीएल (IPL 2022) २०२२ चे विजेतेपद पटकावले. यंदाच्या आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप जोस बटलर (863 धावा) याच्या नावावर झाली. तर पर्पल कॅप युजवेंद्र चहलने २७ विकेट घेत आपल्या नावावर केली. पण या आयपीएलमधील सर्व सामन्यात दाखवली जाणारी कार कोणी घेतली हे माहीत आहे काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला क्वालिफायर २ मध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला. पण, आसीबी संघात यंदा दाखल झालेल्या दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात मॅच फिनिशर चांगली भुमिका निभावली. त्याने आयपीएल २०२२ मधील दमदार कामगिरीच्या जोरावरच तब्बल तीन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन केले. त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात निवडले आहे. आयपीएल २०२२मध्ये आसीबीच्या दिनेश कार्तिकने ‘सुपर स्ट्रायकर ऑफ दी सीजन’ पुरस्कार पटकावला आणि त्याला यंदाच्या आयपीएलमधील टाटा पंच गाडी बक्षीस म्हणून मिळाली. दिनेश कार्तिकला यंदाच्या पर्वात आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात ५.५० कोटींना विकत घेतले. आरसीबीसाठी या किमतीपेक्षा कार्तिक फलंदाची खुप फायदेशीर ठरली.

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा सर्वात आक्रमक फलंदाज म्हणजेच सर्वात वेगवान धावा करणारा. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान धावा करणाऱ्या फलंदाजाची हंगामाच्या शेवटी सुपर स्ट्रायकर म्हणून निवड केली जाते. आणि यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदाच्या आपीएलचा सुपर स्ट्रायकर होता. त्याने या हंगामात १६ सामन्यांत ५५ च्या सरासरीने आणि १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या. १६ डावांत तो १० वेळा नाबाद राहिला आणि एक अर्धशतक झळकावले. नाबाद ६६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही १८० च्या वर राहिला. त्याने फिनिशर म्हणून आरसीबीसाठी अनेक सामने जिंकून दिले. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळले.

दिनेश कार्तिक हा सुपर स्ट्रायकर बनणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू देखील आहे. २०१८ पासून सुरू असलेला सुपर स्ट्रायकर पुरस्कार यापूर्वी फक्त कॅरेबियन खेळाडूंकडे होता. सन २०१८ मध्ये सुनील नरेनने हा पुरस्कार जिंकला होता. यानंतर, २०१९ मध्ये हा पुरस्कार केकेआरचा स्फोटक फिनिशर आंद्रे रसेलला गेला. २०२० मध्ये मुंबई इंडियन्सचा फिनिशर किरन पोलार्डने त्याच्या पॉवर हिटिंगच्या जोरावर हा पुरस्कार जिंकला. आणि २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरने सुपर स्ट्रायकर पुरस्कार जिंकला.

Back to top button