IPL 2022 : ‘या’ खेळाडूंसाठी यंदा आयपीएलमधील पाटी कोरीच | पुढारी

IPL 2022 : ‘या’ खेळाडूंसाठी यंदा आयपीएलमधील पाटी कोरीच

मुंबई : आयपीएलसाठी (IPL 2022) यंदा महालिलाव झाला. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या जर्सीचे रंग बदलले. काही संघांत स्टार खेळाडूंचा भरणा झाला तर काहींना अंतिम अकरा जणांचा संघ मैदानात उतरवताना दमछाक झाली. कधी काळी मैदानावरील अकरा जणांच्या संघाइतकाच राखीव अकरा जणांची दणकट फळी असलेला मुंबई इंडियन्सला यावेळी काही खेळाडूंची उणीव भासली तर दुसरीकडे असे काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.

मोहम्मद नबी :

अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी हा त्या खेळाडूंच्या यादीत आहे. ज्यांना यंदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आयपीएलच्या कारकिर्दीत 17 मॅच खेळल्या आहेत. त्याने 180 धावा केल्या आहेत. तर 2 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. मेगा ऑक्शनदरम्यान केकेआरने त्याला 1 कोटीत खरेदी केले. टी-20 इंटरनॅशनलमध्ये नबीने 88 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 1539 धावा केल्या आहेत. तर 74 बळी टिपले आहेत. इतका चांगला परफॉर्म असूनही त्याला यंदा खेळण्याची संधी मिळाली नाही.

लुंगी एन्गिडी :

यंदाच्या सीझनमध्ये साऊथ आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी संपूर्ण सीझनमध्ये बेंचवर बसला असल्याचे पाहायला मिळाले. त्याने या सीझनमध्ये एकही सामना खेळला नाही. आयपीएल मेगा ऑक्शनदरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांत खरेदी केले होते. त्याने चेन्‍नईकडून खेळताना चांगला परफॉर्म केला होता. मात्र, दिल्लीने त्याला संधी दिली नाही.

जेसन बेहरेनडोर्फ :

यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरेनडोर्फने एकही मॅच खेळली नाही. बिगबॅश लीग 2021-22 मध्ये बेहरेनडोर्फने 13 मॅचमध्ये 16 विकेटस् घेतल्या होत्या. मात्र, फ्रँचाईझीने त्याला एकही मॅच खेळण्याची संधी दिली नाही. आयपीएल ऑक्शनदरम्यान, आरसीबीने 75 लाखांत आपल्या ताफ्यात घेतले होते.

ईशान पोरेल :

भारताचा युवा फलंदाज ईशान पोरेलचा पंजाब किंग्जने 25 लाख देत आपल्या ताफ्यात समावेश केला होता. मात्र, फ्रँचाईझीने त्याला खेळवले नाही. पोरेल एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 6.71 च्या सरासरीने टी-20 मध्ये गोलंदाजी केली आहे. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 30 विकेटस्ची नोंद आहे. (IPL 2022)

Back to top button