PBKS vs RR : राजस्थानचा पंजाबवर ६ विकेट राखून विजय | पुढारी

PBKS vs RR : राजस्थानचा पंजाबवर ६ विकेट राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 : पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. पंजाबने शेवटच्या पाच षटकात एक विकेट गमावून 67 धावा चोपल्या. त्याच्याकडून जॉनी बेअरस्टोने 56 धावा केल्या, तर जितेश शर्मा 18 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानसाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने तीन बळी घेतले.

पंजाबने आजच्या सामन्यात कोणताही बदल केलेला नाही. तर राजस्थान रॉयल्सने एक बदल केला आहे. त्यांनी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश केला आहे. करुण नायरच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.

पंजाब किंग्ज संघ :

शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, संदीप शर्मा

Image

राजस्थान रॉयल्स :

जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल

Image

Back to top button