IPL 2022 : केएल राहुलला दुहेरी फटका, पराभवानंतर भरावा लागणार दंड! | पुढारी

IPL 2022 : केएल राहुलला दुहेरी फटका, पराभवानंतर भरावा लागणार दंड!

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या हंगामात केल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला तिसरा पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी झालेल्या रोमंचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) 18 धावांनी विजयी मिळवला. मात्र, आता लखनौ संघाला पराभवासह दुहेरी फटका बसला आहे. राहुलला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे, तर मार्कस स्टॉइनिसला फटकारण्यात आले.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यादरम्यान केएल राहुलने आयपीएल नियमांच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याचे समोर आले असून यात तो प्रकरणी आढळला आहे. त्यानेही आपली चूक मान्य केली आहे. अशा परिस्थितीत राहुलला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. (IPL 2022)

मार्कस स्टॉइनिसला फटकारले

दरम्यान, लखनौ संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू देखील आयपीएल नियमांच्या लेव्हल-1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यानेही आपली चूक मान्य केली आहे. अशा स्थितीत स्टॉइनिसला दंड ठोठावण्यात आला नसला तरी त्याला फटकारले आहे हे नक्की. वास्तविक, 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टॉइनिसला जोश हेझलवूडने क्लीन बोल्ड केले. पण बाद झाल्यावर स्टॉइनिसचा राग सातव्या गगनाला भिडला आणि तो चिडला. (IPL 2022)

चेंडू वाइड न दिल्याने अंपायरशी घातला वाद

रागाच्या भरात स्टॉइनिसने पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना बॅट वेगाने हवेत जोरात फिरवली. पण तो मध्येच थांबला, कारण यादरम्यान आरसीबीचा एक खेळाडू समोर आला होता. स्टॉइनिसने बॅट फिरवत पुढे नेली असती तर त्या खेळाडूला दुखापत झाली असती. (IPL 2022)

बाद होण्याआधी म्हणजे षटकातील पहिला चेंडू ऑफ साइडमध्ये बराच बाहेर जात होता. हा चेंडू स्टॉइनिस खेळू शकला नाही. फील्ड अंपायरने त्याला वाइड कॉल दिला नाही. यामुळे स्टॉइनिस संतापला आणि त्यांने पंचांशी वाइडबाबत वाद घालण्यास सुरुवात केली. याचा कारणामुळे स्टॉइनिसला फटकारण्यात आले आहे. (IPL 2022)

बंगळूर संघाने 18 धावांनी सामना जिंकला

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळूर संघाने 6 गडी गमावून 181 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने 64 चेंडूत 96 धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 23 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 163 धावाच करू शकला आणि 18 धावांनी सामना गमावला. कृणाल पांड्याने 28 चेंडूत 42 तर कर्णधार केएल राहुलने 24 चेंडूत 30 धावा केल्या. जोश हेझलवूडने 4 बळी घेतले. (IPL 2022)

Back to top button