AFC : एएफसी कप जिंकत मुंबई सिटी एफसीनं रचला इतिहास | पुढारी

AFC : एएफसी कप जिंकत मुंबई सिटी एफसीनं रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयएसएलमधील टीम मुंबई सिटी एफसीने इतिहास रचला आहे. मुंबई संघाने एएफसी (AFC) चॅम्पियन्स लीग स्पर्धेत एयर फोर्स संघाचा २-१ गोल फरकाने पराभव केला. एयर फोर्स संघाचा पराभव करत एएफसी लीग जिंकणारा मुंबई सिटी एफसी हा भारतातील पहिला संघ ठरला आहे. हा सामना सौदी अरेबियाची राजधानी रियाबयेथील फहद स्टेडियम येथे झाला.

सामन्याचा पहिल्या सत्रात आक्रमक खेळी करून ही दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात एयर फोर्स संघ ही कोंडी फोडण्यात यशस्वी झाला. सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला मुंबईच्या बचावफळी भेदत एयर फोर्सचा खेळाडू हम्मादी अहमदने संघासाठी पहिला गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. (AFC)

मुंबईकडून गोलस्कोर करण्यासाठी आक्रमक चढाया करण्यात आल्या. परंतु त्या एयर फोर्सच्या बचावपटूंनी त्या निष्पळ ठरवल्या. सामन्याच्या ७० व्या मिनिटांत मुंबईच्या खेळाडूला एयर फोर्सच्या खेळाडूने अवैद्यरित्या अडवल्याने मुंबई संघाला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत मुंबईच्या डिएगो मॉरिसियोने गोल करत मुंबईला सामन्यात बरोबरी मिळवून दिली.

या गोलनंतर भारताने आक्रमक चढाया केल्या. सामन्यातील ७५ व्या मिनिटाला मुंबईच्या राहूल भेके विजयी गोल नोंदवला. या गोलसह मुंबईने एयर फोर्स संघावर २-१ अशा फरकाने विजय मिळवला. हा सामना जिंकत एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकणारा मुंबई सिटी एफसी हा भारतातील पहिला संघ बनला आहे.

Back to top button