IPL 2022 : लखनौ विरुद्ध हैदराबाद उघडणार विजयाचे खाते ? | पुढारी

IPL 2022 : लखनौ विरुद्ध हैदराबाद उघडणार विजयाचे खाते ?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात आज सनरायजर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंटसशी भिडणार आहे. यंदाच्या पर्वात लखनौने आपला पहिला विजय नोंदवला आहे. तर ते आता आपल्या दुसऱ्या विजयासाठी अग्रेसर असतील. याउलट सनरायजर्स हैदराबादची मागील हंगामतील निराशाजनक कामगिरीची झलक त्यांच्या पहिल्या सामन्यातदेखील पाहायला मिळाली. आजच्या सामन्यात हैदराबाद लखनौला नमवत आपले विजयी खाते उघडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लखनौने चैन्नई सुपर किंग्ज (IPL 2022) या तगड्या संघास नमवत यंदाच्या आपीएलमध्ये आपला पहिला विजय नोंदविला आहे. पहिल्या सामन्यात मात्र त्यांना गुजरात टायटन्सकडून परावभव स्वीकारावा लागला होता. पहिला पराभव बाजूला ठेवत त्यांनी चैन्नईला चांगली टक्कर दिली होती. या सामन्यात कर्णधार केएल राहूल आणि सलामीवीर क्विटंन डिकॉक चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसले होते. त्याच्या भक्कम भागिदारीने विजयात मोलाचे स्थान बजावले होते.

यासह एव्हीन लेव्हिसने आपल्या धडकेबाज फलंदाजीने चैन्नई विरुद्धचा गमावलेला सामना खेचून आणला होता. यासह त्याच्या संघातील युवा फलंदाज आयुष बदोनी यानेदेखील आपल्या कामगिरीची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सध्या लखनौचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. यामुळे अद्याप सूर न गवसलेल्या हैदराबादला ते पराभूत करुन गुणतालिकेतील आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न लखनौचा संघ करु शकतो.

दुसरीकडे सनरायर्स हैदराबादकडून मागील हंगामातील निराशाजनक कामगिरी यंदा पहिल्या सामन्यात देखिल कायम राहिली. राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या फरकाने हैदराबादला पराभूत व्हावे लागले. या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनसह अनेक फलंदाजांना अपयश आले. ॲडम मार्करम आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता कोणाला चांगली कामगिरी करुन दाखवता आली नाही. दुसरीकडे राजस्थानने त्यांच्या गोलंदाजांचा देखिल खरफूस समाचार घेतला होता. यामुळे हैदराबादला आजच्या सामन्यात सर्वच स्थरातील कामगिरी उंचावून पहिला विजय नोंदवावा लागणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ

राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

लखनऊ सुपर जायंट्स संघ

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान

Back to top button