मुंबई; वृत्तसंस्था : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर मात करून आयपीएल 2022 च्या सत्रात विजयी सलामी देणारा कोलकाता नाईट रायडर्स उद्या (बुधवारी) रॉयल चॅलेंजर्स (RCB vs KKR) बंगळूरला नमवून सलग दुसरा विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मात्र, श्रेयसच्या नेतृत्वाखालील केकेआरला फाफ डू प्लेसिस, विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.
आरसीबीचा (RCB vs KKR) कर्णधार फाफ डू प्लेसिस सध्या शानदार फॉर्ममध्ये असून त्याने पहिल्या सामन्यात अवघ्या 57 धावांत 88 धावांचा पाऊस पाडला होता. हाच फॉर्म तो केकेआरविरुद्ध कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आरसीबीला विजय मिळवून द्यावयाचा असेल तर विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकलाही पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. फाफ डू प्लेसिसची फटकेबाजी पाहता केकेआरच्या गोलंदाजांना त्याला रोखण्यासाठी खास रणनीती अंमलात आणावी लागेल.
दरम्यान, बंगळूरच्या (RCB vs KKR) गोलंदाजांनाही पंजाबकडून झालेली धुलाई विसरून भेदक मारा करावयाचा प्रयत्न करावा लागणार आहे. मोहम्मद सिराजने गेल्या सामन्यात 59 धावा दिल्या होत्या. आरसीबीसाठी हर्षल पटेलची गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय श्रीलंकन फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाला केकेआरच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
हेड टू हेड (RCB vs KKR)
टीम इंडियाला मिळाला फिनिशर? तेवातिया बनू शकतो भावी धोनी
महेंद्रसिंग धोनीने आपल्या तडफदार फलंदाजीने टीम इंडियाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिले आहेत. मात्र, धोनी निवृत्त झाल्यापासून टीम इंडिया एका चांगल्या फिनिशरच्या शोधात होती. तो शोध आता संपल्यासारखा दिसू लागला आहे. आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंटस् आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला एक चांगला फिनिशर मिळाल्याचे दिसू लागले आहे.
लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध गुजरातच्या राहुल तेवातियाने अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. त्याने 24 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 40 धावांचा पाऊस पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने या खेळीच्या माध्यमातून टीम इंडियातून खेळण्याचा दावा सादर केला. यामुळे आयपीएल 2022 नंतर तेवातियाला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.