IPL : दिल्ली कॅपिटल्सची मुंबई इंडीयन्सवर चार विकेट्सने मात | पुढारी

IPL : दिल्ली कॅपिटल्सची मुंबई इंडीयन्सवर चार विकेट्सने मात

पुढारी ऑनलाईन डेस्क ः  ललित यादवने  ३८ चेंडूंमध्ये ४८ आणि अक्षर पटेलच्या १७ चेंडूंमध्ये ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडीयन्सवर चार गडी राखून विजय मिळवला. सुरूवातीला मुंबई इंडीयन्सने दिल्ली कॅपिटल्सला धक्के दिल्यानंतर पृथ्वी शॉ आणि नंतर ललित यादवने दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरला. शेवटी अक्षर पटेलच्या ३८ महत्वपुर्ण धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजयाला गवसणी घातली.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघामध्ये ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सामना सुरू आहे. मुंबई इंडीयन्सकडून ईशान किशनने दमदार ४८ चेंडूमध्ये ८१ धावांची खेळी केली. ईशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडीयन्सने २० षटकांअखेर १७७ केल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सला सहावा धक्का

शार्दुल ठाकूर ११ चेंडूंमध्ये २२ धावांची दमदार खेळी करत माघारी परतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सला चौथा धक्का

पृथ्वी शॉ २४ चेंडूंमध्ये ३८ धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का

ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतला आहे.

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का

मुर्गन अश्विनने दिल्ली कॅपिटल्स सलग दोन धक्के दिले आहेत. टीम सेफर्ट १४ चेंडूंमध्ये २१ धावा करत माघारी परतला आहे, तर मंदीप सिंगला भोपळाही न फोडता माघारी जावे लागले.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली आहे. रोहीत शर्मा ३२ चेंडूमध्ये ४१ धावांवर बाद झाला. तर अनमोलप्रितसिंग ९ चेंडूमध्ये ८ धावा करत माघारी परतला आहे. आयपीएलमध्ये सलग नऊ वेळेस अर्धशतकी खेळी करण्यास रोहीत शर्मा अपय़शी ठरला आहे.  (IPL)

पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि ईशान किशनने ५० धावांची भागिदारी केली . मुंबई इंडीयन्सची धावसंख्या १२ षटकांनंतर ९१ इतकी आहे. रोहितने २२ चेंडूमध्ये २९ धावांची खेळी केली आहे तर ईशान किशनने २२ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या आहेत. ईशान किशन आणि टिळक वर्मा क्रिजवर टिकून आहेत.   (IPL)

हेही वाचलतं का? 

Back to top button