SL vs AUS : IPL नंतर ऑस्ट्रेलिया जाणार श्रीलंकेच्या दौ-यावर! | पुढारी

SL vs AUS : IPL नंतर ऑस्ट्रेलिया जाणार श्रीलंकेच्या दौ-यावर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs AUS : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जून-जुलै २०२२ श्रीलंकेच्या दौ-यावर जाणार आहे. त्यादरम्यान तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, पाच एकदिवसीय सामने आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेला भेट देण्याची गेल्या सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. श्रीलंका क्रिकेटने या दौऱ्याचे वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले. वनडे आणि टी २० मालिकेतील सामने एकूण आठ सामने कोलंबो आणि कँडीमध्ये खेळवले जातील, तर कसोटी मालिकेतील सामन्यांत उभय संघ गालेच्या मैदानावर आमने-सामने येतील. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.

या दौऱ्याची सुरुवात ७ जून रोजी पहिल्या टी-२० सामन्याने होईल. तर दौऱ्यातील शेवटचा सामना हा कसोटी सामना असेल. त्याची सुरुवात ८ जुलैपासून होईल. ऑस्ट्रेलियाने २०१६ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता, त्यावेळी त्यांचा कसोटी मालिकेत ०-३ ने क्लिन स्विप झाला होता. पण त्यानंतर कांगारू संघाने जबरदस्त पुनरागमन करत वनडे आणि टी-२० मालिका जिंकली होती. (SL vs AUS)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे सर्व अव्वल खेळाडू सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आयपीएलनंतरच हा दौरा होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. (SL vs AUS)

ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक (SL vs AUS)

७ जून : पहिली टी २०
८ जून : दुसरी टी २०
११ जून : तिसरी टी २०
१४ जून : पहिली वनडे.
१६ जून : दुसरी वनडे
१९ जून : तिसरी वनडे
२१ जून : चौथी वनडे
२४ जून : पाचवी वनडे
२९ जून ते ३ जुलै : पहिली कसोटी
८ जुलै ते १२ जुलै : दुसरी कसोटी

Back to top button