पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहाली कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून श्रीलंकेने पहिल्या डावात 4 बाद 108 धावा केल्या आहेत. श्रीलंका अजूनही भारतापेक्षा 466 धावांनी मागे आहे. सध्या निसांका 26 आणि अस्लंका 12 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून अश्विनने 2, बुमराह आणि जडेजाने 1-1 विकेट घेतली. तत्पूर्वी, भारताने 8 बाद 574 धावा करून डाव घोषित केला. जडेजाने 175 धावांची नाबाद खेळी खेळली, तर अश्विनने (61) अर्धशतकी खेळी साकारली.
रोहितने जडेजाच्या जागी अश्विनला नवा स्पेल टाकण्यास चेंडू हाती दिला. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने धनंजय डी सिल्वाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अश्विनने डिसिल्व्हाला (1) एलबीडब्ल्यू आऊट केले.
अखेर जसप्रीत बुमराहला यावेळी विकेट मिळाली. त्याने सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजला 22 धावांवर एलबीडब्ल्यू केले. मॅथ्यूजने रिव्ह्यू घेतला पण टीव्ही पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कामय ठेवत त्याला बाद घोषित केले.
फलंदाजीनंतर रवींद्र जडेजाने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. त्याने पहिल्याच षटकात श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारतनाला बाद केले आणि पाहुण्या श्रीलंका संघाला दुसरा धक्का दिला. आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जडेजाने करुणारत्नला 28 धावांवर एलबीडब्ल्यू केले.
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारताला पहिला ब्रेकथ्रू देत लाहिरू थिरिमानेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अश्विनने आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर थिरिमानेला 17 धावांवर एलबीडब्ल्यू केले.
विराट कोहलीने आपल्या 100व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 45 धावा केल्या आणि एम्बुल्डेनियाने त्याला बोल्ड केले. हनुमा विहारीने 58 धावांची खेळी खेळली आणि त्याला विश्व फर्नांडोने बाद केले. भारताची 5वी विकेट श्रेयस अय्यरच्या रूपाने पडली, त्याला धनंजय डी सिल्वाने 27 धावांवर बाद केले. ऋषभ पंतने 96 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि अवघ्या 4 धावांनी त्याचे पाचवे कसोटी शतक हुकले. सुरंगा लकमलच्या चेंडूवर ऋषभ पंतचा डाव संपुष्टात आला. अश्विनच्या रूपाने भारताला 7वा धक्का बसला. त्याने 61 धावांची खेळी केली, तो डिकवेलाच्या हाती लकमलकरवी झेलबाद झाला. जयंत यादवच्या रूपाने भारताला 8वा धक्का बसला. जयंतला थिरिमानेच्या हाती विश्वा फर्नांडोने झेलबाद केले. रवींद्र जडेजाने नाबाद 175 धावा केल्या तर मोहम्मद शमीने नाबाद 20 धावांची खेळी केली.
रवींद्र जडेजाने शानदार फलंदाजी करताना 228 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच षटकार मारत 150 धावांचा टप्पा पूर्ण केला. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे 11वे शतक आहे. यापूर्वी, जडेजाने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये आपली दोन्ही शतके सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना झळकावली. जडेजाने त्याची बॅट तलवारबाजीच्या स्टाईलने चालवत शतक केल्याचा आनंद साजरा केला.
नाबाद 175 धावा करणारा जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 7 व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूर कसोटीत 163 धावा केल्या होत्या.
१२९.२ षटकांपर्यंत भारताने ८ गडी गमवून ५७८ धावा केल्या आहेत. यामध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने ७६.७५ च्या सरासरीने २२८ चेंडूत १७५ धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शामीने ५८.८२ च्या सरासरीने ३४ चेंडूत २० धावा केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसाेटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकारली. यानंतरही त्याने तुफानी खेळी करत १५२ धावा फटकावल्या. जडेजाने १६० चेंडूत आपलं शतक पूर्ण केले हाेते. यानंतर पुढील ५० धावा ५१ चेंडूत पूर्ण केले. त्याने यापूर्वी टी-२० मालिकेतही धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने आपल्या खेळीत सातत्य ठेवतकसोटीतही तुफानी खेळी केल्याने भारताने पहिल्या डावात ५०० धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताच्या फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताने ५०० धावांचा टप्पा पार केला आहे.
लंच ब्रेकनंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेले रविंद्र जडेजाने फलंदाजी करण्यास सुरूवात केली त्याने १७२ चेंडूत १०४ धावा केल्या. तर जयंत यादवला लंच ब्रेकनंतर फार काळ मैदानावर टिकता आले नाही. त्याला श्रीलंकेच्या फर्नांडोने थिरिमाने करवी झेल बाद केले. जयंत यादवने १८ चेंडूत २ धावा करून त्याला फर्नांडोने तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाची सुरूवात भारताने ६ बाद 357 धावांपासून पुढे खेळण्यास केली. यावेळी पाहुण्या संघासमोर धावांचा डोंगर उभारण्याचे ईराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी लंच ब्रेकपर्यंत ७ गडी गमवून ४६८ धावांचा महाकाय डोंगर उभा केला आहे. यावेळी टी-२० मालिकेतील फॉर्ममध्ये सातत्य ठेवत रविंद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक त्याने साजरे केले. त्याला साथ देणाऱ्या रविचंद्रन अश्विनने देखील आपल्या कारकिर्दीतील १२ वे शतक साजरे केले. परंतु अर्धशतक साजरे केल्यानंतर अश्विन जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो ६१ धावा करून बाद झाला. आता जयंत यादव मैदानात फलंदाजीसाठई आला आहे.
कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी जडेजाने शतकी खेळी केली. जडेजाने १६० चेंडूत शतक पूर्ण केले. रवींद्र जडेजाने टी-२० मालिकेतीलही धमाकेदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने आपल्या खेळीत सातत्य ठेवत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतही शतकी खेळी केली. जडेजाचे कसाेटीतील हे दुसरे शतक आहे.
रविचंद्रन अश्विनने ७४.४४ च्या सरासरीने ८२ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. त्याला श्रींलंकेच्या लकमलने डिकवेला करवी झेल बाद केले.
सामन्यातील १०८ व्या षटकांत भारताने ४५० धावांचा टप्पा पार केला. यावेळी रविंद्र जडेजाने १५३ चेंडूत ९३ धावा केल्या तर रविचंद्रन अश्विनने ७९ चेंडूत ५७ धावांवर खेळत आहे.
अश्विनने श्रीलंका विरूध्दच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी आपले कसोटीमधील १२ वे अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने रविंद्र जडेजासोबत ७व्या विकेटसाठी १६२ चेंडूत ११६ धावांची भागिदरी केली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्या कसोटी सामन्यांतील दुसऱ्या दिवशी १०२ षटकांपर्यंतच्या डावात भारताने ४२६ धावा केल्या आहेत. यामध्ये जडेजाने ५९.२६ च्या सरासरीने १३६ चेंडूत ८१ धावा केल्या तर त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणाऱ्या अश्विनने ५५ चेंडूत ४१ धावा केल्या आहेत.(IND vs SL 1st TEST DAY 2)
४०० धावांचा टप्पा पार!
सामन्याच्यान ९८व्या षटकांपर्यंत भारताने ४०० धावांचा टप्पा पूर्ण केला. यावेळी जडेजाने १३१ चेंडूत ७७ धावा केल्यातर अश्विनने ४० चेंडूत २४ धावा केल्या आहेत. या दोन फलंजांमध्ये १०५ चेंडू खेळून ७५ धावांची भागिदारी केली आहे.
रविंद्र जडेजाचे शानदार अर्धशतक
भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने सामन्यातील दुसऱ्यादिवशी आपल्या कारकिर्दीतील १८ वे अर्धशतक झळकवले. आतापर्यंत त्याने ५३.७०च्या सरासरीने ११२ चेंडूत ६० धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा यांच्यात ७४ चेंडूत ४८ धावांची भागीदारी झाली आहे.
मोहाली येथे सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेर ८५ षटक खेळून ३५७ धावा केल्या. यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचे ६ फलंदाज बाद करण्यात यश आले.
३५७/६ या धावसंख्येसह भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत आहेत. जडेजाने ८२ चेंडूत ४५ धावा केल्या आहेत तर अश्विनने ११ चेंडूत १० धावा केल्या आहेत. तर हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताला भक्कम आघाडी देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
भारताकडून पहिल्या दिवशी ऋषभ पंतने ९८.९७ च्या सरासरीने ९८ चेंडूत सर्वाधिक ९६ धावा केल्या. यावेळी तो चांगलीच आक्रमक फलंदाजी करत होता. त्याच्या बरोबर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या बदली जागा मिळालेल्या हनुमा विहारीने ४५.३१च्या सरासरीने १२८ चेंडूत ५८ धावा केल्या. कारकिर्दीमधील १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात ४५ धावा केल्या त्या सोबत तो कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा करणारा ६वा खेळाडू बनला आहे. (IND vs SL 1st TEST DAY 2)
श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया दोन गडी टिपले. त्याने मयांक अग्रवाल आणि विराट कोहली यांना बाद केले. तर धनंजया डी सिल्वा, लाहिरु कुमार, विश्वा फर्नांडो, सुरंगा लकमल यांनी प्रत्येकी एक-एक भारताचा गडी टिपला. यावेळी श्रीलंकेचा गोलंदाज चारिथ असलंका याच्या पदकरात अजून एकही गडी पडली नाही.