FIFA Bans Russia : फिफाने रशियाला दिला मोठा दणका, कल्पना करू शकणार नाही अशी घातली बंदी! | पुढारी

FIFA Bans Russia : फिफाने रशियाला दिला मोठा दणका, कल्पना करू शकणार नाही अशी घातली बंदी!

झुरीच : पुढारी ऑनलाईन

युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने (FIFA) मोठी घोषणा करत रशियाला मोठा धक्का दिला आहे. रशियावर बंदी घालत फिफाने यापुढे रशियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. इतकंच नाही तर रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांना परदेशात फिफाच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फिफाने अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. (FIFA Bans Russia)

इतकंच नाही तर रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांना परदेशात फिफाच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर फिफाच्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात रशियाचा ध्वज फडकवला जाणार नाही आणि राष्ट्रगीताचे गायन होणार नाही, असे फिफाने जाहीर केले आहे. (FIFA Bans Russia)

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रशियाचा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना, जो तटस्थ ठिकाणी खेळला गेला तर चाहत्यांना स्टेडियममध्ये सामना बघू देणार नाही, असेही फिफाने म्हटले आहे. जगभरातील अनेक देशांना क्रीडा क्षेत्रात रशियाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. या युक्रेनवरील हल्ल्याच्या घटनेनंतर फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने मोठा निर्णय घेत रशियावर ही कडक बंदी लादली आहे. (FIFA Bans Russia)

दरम्यान, युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चेक प्रजासत्ताक, इंग्लंड, पोलंड आणि स्वीडनने रशियासोबत कोणतेही आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळण्यास नकार दिला आहे. (FIFA Bans Russia)

तत्पूर्वी, स्वीडनच्या फुटबॉल फेडरेशनने मोठी घोषणा केली. स्वीडनचा संघ फिफा विश्वचषक 2022 साठी रशियाविरुद्ध प्लेऑफ सामना खेळणार नाही, असे त्यांनी सांगितले. रशियाने युक्रेनवर जबरदस्तीने युद्ध लादल्यामुळे त्याच्याविरोधात हे पाऊल उचलण्यात आले. यापूर्वी पोलंडनेही रशियाविरुद्धचा विश्वचषक प्ले-ऑफ सामना खेळण्यास नकार दिला होता. (FIFA Bans Russia)

Back to top button