India vs South Africa 3rd Test : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ गडी राखून विजय | पुढारी

India vs South Africa 3rd Test : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ गडी राखून विजय

केपटाऊन : पुढारी ऑनलाईन

केपटाऊनमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी राखून जिंकला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

भारताने आफ्रिकेत 2010-11 साली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. तीच भारताची आफ्रिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दक्षिण आफ्रिकेने केवळ 3 गडांच्या बदल्यात 212 धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्या दरम्यान पीटरसनने 82 धावांची निर्णायक खेळी केली. त्याला शार्दुल ठाकूरने आउट केले.

भारताचा दुसरा डाव काल 198 धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून ऋषभ पंतने झुंजार शतकी (नाबाद 100) खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 198 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावातील 13 धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 3 गडांच्या बदल्यात पार केले.

भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

1992-93 पासून आजपर्यत म्हणजे तीस वर्षात  भारताला दक्षिण आफ्रिकेच्या मायभूमीवर एकदाही कसोटी मालिका जिंकता आली नाही.

 

 

Back to top button