

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मुरली विजय याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा मुरली विजयची चर्चा ही दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीसोबतच्या अफेअर्समुळे अधिक रंगली.
कार्तिक आणि निकिता एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, दोघांनी लग्न केले. मुरली विजय आणि दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्येही एकत्र खेळायचे. 2012 मध्ये आयपीएलदरम्यान मुरली विजयची आणि कार्तिकची पत्नी निकिता यांच्यात मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दिनेश कार्तिकला हे कळताच त्यांच्या मैत्रीत आणि कौटुंबिक आयुष्यात भूकंप झाला. दिनेश कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला. यानंतर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. आता दोघेही एकत्र राहतात. दिनेश कार्तिकने स्क्वॉशपटू दीपिकाशी लग्न केले.