Sperm Donor : ‘स्पर्म डोनर’ निघाला ६० मुलांचा बाप, सगळी मुलं दिसायला ‘सेम टू सेम’
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही वर्षांत स्पर्म डोनेट करण्याचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोक स्पर्म डोनेट करण्यासाठी पुढे येत असतात. स्पर्म डोनेट करणे, ही बाब अनेक ठिकाणी सामान्य देखील झाली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील एक स्पर्म डोनर चांगलाच चर्चेत आला आहे. (Sperm Donor) सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चर्चेत असणारा हा स्पर्म डोनर ६० मुलांचा बाप आहे. यामध्ये विशेष बाब ही आहे की, त्याची ६० मुलं दिसायला 'सेम टू सेम' आहेत. एका पार्टीत ही मुले एकत्र आली होती. या वेळी या सर्व मुलांचा जन्मदाता एकच असल्याची माहिती समोर आली आहे. (Sperm Donor) सर्व मुलांचा चेहरा एकसारखाच असल्याने सर्व पालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्पर्न डोनर विषयी कोणालाही नव्हती माहिती (Sperm Donor)
ऑस्ट्रेलियातील या व्यक्तीने त्याचे स्पर्म LGBTQ+कम्युनिटीच्या काही सदस्यांना दान केले होते. स्पर्म डोनेशनच्या नियमांनुसार, एका वेळी फक्त एकाच डोनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. (Sperm Donor) मात्र, या व्यक्तीने आपली ओळख लपवून आणि ४ वेगवेगळ्या नावांची नोंद करून अनेक पालकांना स्पर्म डोनेट केले होते. कोणालाही या मुले एकसारखी का दिसत आहेत? याची माहिती मिळत नव्हती.
यामुळे झाला स्पर्म डोनरचा पर्दाफाश
स्पर्न डोनरने सर्व नियमांचे उल्लंघन करुनही कोणाला याबाबत समजले नव्हते. त्याने ओळख बदलून केलेले डोनेशन कोणाला समजणार नाही, असे त्याला वाटत होते. मात्र, काही वर्षांनी ही 60 मुलं एका ठिकाणी पार्टीसाठी एकत्र आले. तेव्हा या सर्व मुलांचे चेहरे एकसारखेच असल्याने पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पालकांनी याबाबत माहिती मिळवण्यासाठी रुग्णालय गाठले. तेव्हा या स्पर्म डोनरचे गूढ सर्वांसमोर उघड झाले. (Sperm Donor)

