राजकारणासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका, एमपीएसीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया | पुढारी

राजकारणासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका, एमपीएसीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन: एमपीएसीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. आयोगाकडून नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम रद्द करा अशी मागणी केली नाही, त्यांना केवळ वेळ मिळावी अशी त्यांची मागणी होती. ती मागणी आम्ही मान्य केली आहे. MPSCने अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच हा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता, तर दुरीकडे त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या विषयात कोणीही राजकारण आणू नये, त्यासाठी बाकी अनेक विषय आहेत. विरोधक विद्यार्थ्यांना वेठीस न धरता दुप्पटी भूमिका घेणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

Back to top button