दुसर्या डावात शुभमन गिलला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भारताचा धावांचा पाठलाग व्यवस्थित सुरू असताना भारताला पहिला झटका 41 धावांवर बसला. स्कॉट बोलँडने शुभमन गिलला कॅमेरून ग्रीनकडे झेल देण्यास भाग पाडले. मात्र, ग्रीनच्या या झेलावरून वाद सुरू झाला आहे. स्लीपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसर्या पंचांनी त्याला आऊट दिले. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगही शुभमन नाबाद असल्याचे म्हटले. त्यानंतर चाहतेही खूप संतापलेले दिसत होते. सोशल मीडियावर तिसर्या पंचांच्या या निर्णयाविरोधात अनेक मिम्स व्हायरल होत होते.