उत्तर कोरिया हुकूमशहा
Latest
Kim Jong Un : किम जोंग उन यांच्या हत्येच्या तयारीत दक्षिण कोरिया
सेऊल; वृत्तसंस्था : दक्षिण कोरियाचे लष्कर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या हत्येची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाने याची कबुली दिली असून, किम यांच्या संभाव्य हत्येबाबत दक्षिण कोरियाचे लष्कर हत्या अभ्यास करत आहे.
उत्तर कोरियाचा मुकाबला करण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन यांची हत्या करण्याचा एक पर्याय आहे. त्यावर दक्षिण कोरियन लष्कर काम करत आहे. त्याची तयारी सुरू असून, आम्हाला अमेरिकन लष्कराचे सहकार्य मिळत असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. किम यांनी 2024 साठी आपली नुकतीच रणनीती तयार केली असल्याचे सांगितले होते.