आई माफ कर, कुस्ती जिंकली, मी हरले...विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा

Indian Wrestler Vinesh Phogat : विनेश फोगाटची भावूक पोस्ट व्हायरल
Indian Wrestler Vinesh Phogat
आई माफ कर, कुस्ती जिंकली, मी हरले...विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदाPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी बुधवारी (दि.७) अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान विनेश फोगाटने मोठा निर्णय घेत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने आपल्या 'X' अकाउंटवर भावूक पोस्ट करत म्हटले आहे, "आई माफ कर, कुस्ती जिंकली, मी हरले...कुस्तीला अलविदा"

Indian Wrestler Vinesh Phogat : मी हरले, माफ करा....

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Indian Wrestler Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विविध स्तरातून संमिश्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या आहेत. दरम्यान विनेश फोगाटने आपल्या एक्स (Twitter) अकाउंटवर भावूक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं आहे की, "आई, कुस्तीचा सामना जिंकला, मी हरले. माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ 🙏मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, क्षमस्व.

विनेश 'का' झाली कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र  

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. कारण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. भारतीय संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही बुधवारी (दि.७) सकाळी फोगाटचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

काय सांगतात वजनासंदर्भातील नियम?

  • वेट-इन टायमिंग : कुस्तीपटूंनी त्यांच्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी वजन करणे आवश्यक आहे.

  • वजन श्रेणी : कुस्तीपटूंनी त्यांच्या विशिष्ट वजन श्रेणीमध्ये वजन केले पाहिजे. त्यांनी त्यांच्या गटासाठी नेमलेल्या अचूक वजन मर्यादा पूर्ण केल्या पाहिजेत.

  • पोशाख : कुस्तीपटूंनी केवळ स्पर्धेसाठी परवानगी असलेली वस्त्रे परिधान करणे आवश्यक आहे. अचूक वजन मोजण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कपडे किंवा उपकरणे वापरण्याची परवानगी नाही.

  • वैद्यकीय तपासणी : वजन वाढवल्यानंतर, कुस्तीपटू स्पर्धेसाठी त्यांच्या फिटनेसची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करतात. या परीक्षेत कोणत्याही संभाव्य आरोग्य जोखीम किंवा परिस्थितीचे मूल्यांकन समाविष्ट आहे जे त्यांच्या कामगिरीवर किंवा स्पर्धेतील सुरक्षिततेवर परिणाम करू शकतात., खेळाडूंच्या वजनाबाबतचे नियम काय आहेत? जाणून घेवूयात... (Vinesh Phogat Disqualified)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news