Odisha Train Tragedy : ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना सोनू सूदचा मदतीचा हात

सोनू सूद
सोनू सूद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशा रेल्वे अपघात घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अजूनही अनेक जखमी, मृत लोक यात सापडत नसल्याचा बातम्या देखील येत आहेत. अडीचशेहून अधिक मृत्यू आणि ९०० हून अधिक लोक जखमी झाल्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अनेकांनी अपघाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. (Odisha Train Tragedy) आता बॉलीवुड अभिनेता सोनू सूदने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी त्याच्यासोबत त्याची खास टीम या कामाला लागली आहे. अभिनयाच्या पलिकडे जाऊन अनेकदा माणुसकी जपत या अभिनेत्याने अनेक सामाजिक काम केलं आहे आणि आता पुन्हा सोनू ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियां साठी काम करताना दिसत आहे. त्यांच्या टीमने हाती घेतलेल्या या पुढाकारांचा खुलासा करणारा एक व्हिडिओ सोनूने शेअर केला आहे. (Odisha Train Tragedy )

सोनू सूदने ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांना त्यांचे जीवन पुनर्निर्माण करण्यात मदत करण्याचे वचन दिले आहे. अपघाग्रस्तांना त्यांचा व्यवसाय स्थापन करण्यात आणि शिक्षणासाठी मदत देण्याचा अनोखा निर्णय सोनूने घेतला आहे. सोनूची टीम या कुटुंबांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.

पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदने एक हेल्पलाईनची स्थापना केली आहे. जेणेकरून ज्यांना मदतीचा हात हवा असेल अशी लोक या हेल्प लाईनमधूनच्या माध्यमातून सोनूपर्यंत पोहोचू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news