

बॉलिव लिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. सबा आणि मुलांसह त्यांने युरोपमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन केले आहे. मुले रेहान आणि हृदान यांच्यासह त्यांच्याबरोबर हृतिकची चुलत बहीण पश्मिना रोशन, तसेच कुटुंबातील अन्य सदस्यही होते. हृतिकने ख्रिसमसच्या सुट्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तो, सबा आझाद आणि मुलांबरोबर बर्फात पोज देताना दिसत आहे. त्यांच्या हातात छत्र्यादेखील आहेत. मेरी ख्रिसमस ब्युटीफूल पिपल, असे कॅप्शन हृतिकने हा फोटो पोस्ट केला आहे. सर्वजण स्वित्झर्लंडमध्ये इन्स्टाग्रामवर बर्फाचा आनंद लुटताना काळी छत्री धरून हसताना आणि पोज देताना दिसत आहेत.