

'दिवसांपूर्वी 'पठाण' चित्रपटातील 'बेशर्म रंग' गाणे रीलिज झाले आणि यावरून वाद निर्माण झाला. याच गदारोळात या चित्रपटातील दुसर गाण 'झूमे जो पठाण' प्रदर्शित झाले, पण या गाण्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत चित्रपटातील दोन गाणीच रीलिज झाली आहेत. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, अशातच एका चाहत्याने शाहरुखला ट्रेलरबद्दल विचारले असता त्याने भन्नाट उत्तर दिले आहे. ट्विटरवर शाहरुखने हा हा 'माझी मर्जी! ट्रेलर 'येईल त्यावेळी येईल', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याचा लहान मुलगा अबराम बोलवत असल्याने जावे लागत असल्याचे शाहरुख म्हणाला. जाण्यापूर्वी त्याने त्याच्या चाहत्यांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.