आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर साराचा नमस्कार!

आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर साराचा नमस्कार!

'आयफा'च्या ग्रीन कार्पेटवर अनेक तारकांचा जलवा पाहायला मिळाला. राखी सावंत, नोरा फतेही, दिव्या खोसला कुमार, जॅकलिन फर्नांडिस यांच्यापासून ते जेनेलिया डिसुझा-देशमुखपर्यंत अनेक तारकांनी 'शानदार अंदाज में' या ग्रँड इव्हेंटमध्ये पदार्पण केले. राखीने नेहमीप्रमाणेच दंगामस्ती केली. शोभेसाठी ठेवलेली भली मोठी ट्रॉफी उचलून 'मला हे हवे' असे ओरडत पोज दिली.

दुसरीकडे सारा अली खानने मात्र शांतपणे येऊन व सर्वांना हात जोडून नमस्कार करून मनं जिंकली. सारा नेहमीच आपल्या गोड वागण्याने सर्वांना आपलेसे करीत असते. पापाराझींपासून सामान्य चाहत्यांपर्यंत सर्वांशीच तिचे वागणे असे हलके-फुलके असते. ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आलेल्या साराने ग्रीन कार्पेटवर शालिनतेने सर्वांना नमस्ते केले!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news