समांथा रूथ प्रभू पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सतत चर्चेत असते. तिचे खासगी आयुष्य, एखादे आयटम साँग, एखाद्या टॉक शोमधील सहभाग किंवा सोशल मीडियातील सक्रियता यामुळेच तिची चर्चा होत असते. आता समंथा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. समंथाच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'यशोदा.' या चित्रपटाचे पोस्टर तिने सोशल मीडियातून शेअर केले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये तिने चित्रपटाचा टीझर कधी येणार तेही सांगितले आहे.

'यशोदा' हा समंथा रूथ-पभूचा पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. पोस्टरमधील समंथाच्या लूकने उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटाचा टीझर 9 सप्टेंबर रोजी 5 वाजून 49 मिनिटांनी रीलिज करण्यात येणार आहे. हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे 'फॅमिली मॅन-2' नंतर समंथा पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अ वतारात दिसणार आहे.

तसेच एका व्हिडीओत समंथा गर्भवती असून सहज पोहोचता येणार नाही, अशा ठिकाणी ती दिसते. एका महिलेची कहाणी यात आहेच; पण यात हॉरर तडका देखील असू शकतो. चित्रपटाचे
दिग्दर्शन हरिशंकर आणि हरिश नारन यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news