सनी देओल म्हणतो, इतरांशी तुलना नको

सनी देओल
सनी देओल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या 'गदर: एक प्रेम कथा'चा सिक्वेल 'गदर-२' लवकरच प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. परंतु, याच दिवशी अक्षय कुमारचा 'ओएमजी २' चित्रपटही रिलिज होणार आहे.

यावर सनी म्हणाला, गदर चित्रपट (पहिला भाग) 'लगान' बरोबर रिलिज झाला होता. त्यावेळी 'गदर' ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. तर दुसरीकडे 'लगान'ने खूपच कमी कमाई केली होती. त्यामुळे मला कळत नाही, लोक आमच्या चित्रपटाची इतरांशी तुलना का करतात? चांगल्या चित्रपटांची इतरांशी तुलना केली जाऊ नये. 'घायल' आणि 'दिल' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीही मला हाच अनुभव आला होता. दोन्ही चित्रपट वेगवेगळे होते. तरीही काही लोक तुलना करतात.

मला हेच सांगायचे आहे की, ज्या चित्रपटांची बरोबरी होऊ शकत नाही, त्यांची तुलना करू नका. 'ओह माय गॉड २'मध्ये अक्षय भगवान शिवशंकराच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news