रितेश देशमुख म्हणतो, ‘ती’ सर्वात मोठी चूक!

Riteish Deshmukh
Riteish Deshmukh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अभिनेता रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच त्याने 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटाच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. रितेश आणि जेनिलिया नुकतेच करिना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी चित्रपटसृष्टी, त्यांचे नाते आणि मुलांबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.

यावेळी करिनाने रितेशला त्याने साकारलेल्या स्त्रीपात्रांविषयी विचारले. यावर रितेश म्हणाला, मी जेव्हा 'अपना सपना मनी मनी' हा चित्रपट करत होतो, त्यावेळी मला तरी आठवत नाही की, इतर कोणत्याही अभिनेत्याने महिलेचे पात्र एखाद्या चित्रपटात साकारले होते. माझ्यासाठी महिलेचे पात्र साकारणे खूपच आव्हानात्मक होते. तसेच एक वेगळा आनंदही होता. त्यावेळी मी तरुण होतो, त्यामुळे एक वेगळाच जोश होता.

या चित्रपटासाठी मी वॅक्सिंग करण्यासाठी गेलो आणि तेव्हा वॅक्सिंग करतेवेळी मी जोरजोरात ओरडत होतो. फक्त वॅक्सिंग नाही, मी तर तेव्हा थ्रेडिंगही केले होते. त्यावेळी मी आयब्रोही केले होते; पण यानंतर माझ्या आयब्रोत केस येणेच बंद झाले. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे रितेश म्हणाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news