मी खूपच थकले होते

करिश्मा कपूर
करिश्मा कपूर
Published on
Updated on

अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 चे दशक गाजवले होते. दिल तो पागल है, राजा हिंदुस्थानी, हम साथ साथ है, राजा बाबू, कुली नं. वन असे सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. मात्र करिश्मा अनेक वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता अखेर तिने यामागचे कारण सांगितले आहे. करिश्मा पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'मर्डर मुबारक' हा चित्रपट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, सिनेसृष्टीतून ब—ेक घेणे ही माझी चॉईस होती. मी लहान वयातच म्हणजे शाळेनंतर काम करायला सुरुवात केली. अनेक वर्षे मी दिवसातून तीन किंवा चार शिफ्टस्मध्ये काम केले आहे. मी दरवर्षी 8 ते 10 चित्रपट प्रदर्शित करायचे. मी खूप काम केले आणि त्यामुळे मी खूप थकले होते. नंतर मी चित्रपटांमधून ब—ेक घेण्याचं ठरवलं. कारण मला 100 दिवसांच्या लांब आऊटडोअर शूट शेड्यूलसाठी जायचं नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news