माधुरीचा मुंबईत नवा आशियाना

माधुरीचा मुंबईत नवा आशियाना
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली:

बॉलीवूड अभिनेत्री व 'धकधक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने मुंबईत नुकताच एक आशियाना खरेदी केला आहे. हे घर साडेपाच हजार चौरस फूट क्षेत्रात पसरले आहे. माधुरीचे हे घर मुंबईच्या वरळी भागात 29 व्या मजल्यावर आहे. तेथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगद द़ृश्य पाहता येते. तर रात्रीच्या वेळेस मायानगरीचे एक वेगळे नयनरम्य रूपडे नजरेस पडते. याशिवाय माधुरीच्या घरातून निळ्याशार अथांग समुद्राचेही दर्शन घडते. सध्या या अपार्टमेंटची काही छायाछित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घराचे सर्व डिझाईन माधुरी आणि पती श्रीराम नेने यांच्या आवडीनुसार करण्यात आले आहे. असेही समजते की, माधुरीने हे घर लिजवर घेतले असून प्रत्येक महिन्याचे भाडे 12.5 लाख रुपये इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news