माझे कुटुंब माझ्यासाठी खास : करिना कपूर

करिना कपूर
करिना कपूर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; सैफ अली खान, करिना कपूर सोशल मीडियावर सक्रिय असतात. 'टशन' चित्रपटापासून दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. दोन मुलांचे ते आई-वडील आहेत. करिनाने लग्नानंतरदेखील करिअर सुरू ठेवले आहे.

नुकतीच तिने एका मुलाखतीत आगामी चित्रपटांबाबत माहिती दिली. 'मी कायमच माझ्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. माझा नवरा, माझी मुले, माझे पालक, माझी बहीण हे माझ्यासाठी खास आहेत. एक पालक नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. सैफचा 'आदिपुरुष' चित्रपट पूर्ण केला आहे. आता माझी काम करण्याची वेळ आली आहे. मला माहीत आहे की, आमचा हा प्रवास वळणांचा आहे जो अजूनही अवघड आहे. हे करणे सर्वात कठीण आहे,' असे करिनाने म्हटले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता पहिल्यांदाच करिनाबरोबर काम करणार आहेत. त्यांनी 'अलिगढ', 'छलांग', 'ओमेरात' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटात करिना मुख्य भूमिकेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news