

फार पूर्वी ललिता पवार, मिनाक्षी शिरोडकर यासारख्या मराठी अभिनेत्रींनी तोकडे कपडे परिधान करून खळबळ माजवली होती. मधल्या काळात मराठी अभिनेत्री कौटुंबिक चित्रपटांमध्येच रमल्या होत्या. सध्याच्या अभिनेत्री मात्र हिंदी अभिनेत्रींप्रमाणेच ग्लॅमरस पोशाखात दिसून येत असतात. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रूचिरा जाधवही सध्या अशाच पोशाखामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच बिकिनीमधील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. स्विमिंग पूलमध्ये तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटस्चा वर्षाव केला आहे. 'माझ्या नवर्याची बायको' या मालिकेमुळे रुचिराला प्रसिद्धी मिळाली होती.