बॉक्स ऑफिसवर अक्षय-अजयची टक्कर

बॉक्स ऑफिसवर अक्षय-अजयची टक्कर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि अजय देवगणचा 'थँक गॉड' हे चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ऑक्टोबरला प्रदर्शित होत असून दोन्ही चित्रपटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. बॉक्स ऑफिस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, दोन्ही चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा रेशो जवळपास सारखा आहे.

'राम सेतू' च्या तिकिटाची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाला थोडा फायदा होऊ शकतो. जिथे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे, तिथे 'राम सेतू' ला थोडा फायदा होताना दिसतोय. कारण मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांची संख्या जास्त असते; पण ही आघाडी फारशी नसेल.

कारण, जिथे अ‍ॅडव्हान्स बुकिंग होणार नाही, तिथे कॉमेडी जॉनरमुळे 'थँक गॉड' ला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. आता यातील कोणता चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरतोय, हे लवकरच दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news