बाल्कीच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले संगीतकार

बाल्कीच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले संगीतकार

आर. बाल्की हा स्वतःचे वेगळेपण जपलेला दिग्दर्शक आहे. त्याचे 'चिनी कम', 'पा', 'कि अँड का' हे चित्रपट आवडणार्‍यांचा एक मोठा वर्ग आहे, तर बाल्कीच्या आगामी 'चुप : द रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटाचे पोस्टर रीलिज करण्यात आले आहे. सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सनी देओल, दुलकर सलमान, श्रेया धन्वंतरी आणि पूजा भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून दिग्गज फिल्ममेकर गुरुदत्त आणि त्यांचा क्लासिक चित्रपट 'कागज के फूल'ला आदंराजली देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

बाल्की आणि अमिताभ बच्चन हे एक समीकरण आहे. बाल्कीच्या प्रत्येक चित्रपटात अमिताभ असतोच. 'चुप' चित्रपटातही अमिताभ बच्चन आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे 'बिग बी' अमिताभ बच्चन म्युझिक कंपोजर म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटातील अखेरचा जो म्युझिक पीस आहे तो अमिताभ बच्चन यांनी स्वतः कंपोज केला आहे. बाल्की म्हणाला की, हा चित्रपट जेव्हा बच्चन यांनी पाहिला तेव्हा त्यांनी पियानोवर संगीतातील एका रागावर आधारित एक ट्रॅक स्वतःच ऐकवला. तो त्यांच्या भावनांचा आविष्कार होता. हेच कम्पोझिशन आम्ही चित्रपटासाठी एंडिंग टायटल ट्रॅक म्हणून वापरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news