pratik
मनोरंजन
प्रतीकला आवडतो गुजराती चहा
एकीकडे आंतरराष्ट्रीय चहा दिवस जगभरात साजरा होत असताना बॉलीवूडनेदेखील त्यात मागे राहण्याचे काही कारण नाही. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत चहाची मोहिनी सर्वांभोवती राहिली आहे. यात प्रतीक गांधीचाही समावेश आहे. तो म्हणतो, मला गुजराती चहा अधिक आवडतो. आले, घरी तयार केलेला मसाला, लेमन ग्रास व पुदिनाचा त्यात समावेश असतो. मला चहात दूध आवडत नाही. मी अनेकदा सेटवर घरी केलेला मसाला घेऊन जातो आणि तेथे चहा करून घेतो.

